Post
Topic
Board Regional Languages (India)
Re: Marathi - Maharashtra (India) | अधिकृत बीटकॉईन मराठी चर्चा धागा
by
TigerKing
on 30/12/2016, 03:00:50 UTC
Free Bitcoins (or micro or satoshi) kase milvayche??


नमस्कार आपले स्वागत आहे..

बीटकॉईन किंवा सातोशी मिळवण्यासाठी शेकडो Bitcoin Faucets उपलब्ध आहेत पण त्यातून मिळणारे उत्पन्न हे अतिशय कमी असते आणी त्यातून आपलेच नुकसान होते. म्हणजे समजा एखाद्या Bitcoin Faucet वर १,००० सातोशी (म्हणजे आजच्या भावानुसार ६६ पैसे) जरी मिळत असले तरी त्यासाठी तुम्हाला तुमची २ मिनिटं, वीज आणी इंटरनेटचा खर्च सगळं मिळून एक रुपया जरी पकडला तरी दर कृतीमागे आपले ३४ पैसे नुकसान होते.


त्यामुळे मी तरी Faucets पासून दूर रहाण्याचा सल्ला देईन, या उलट तुम्ही खालीलपैकी गोष्टींमध्ये सहभाग घेतला तर तुम्हाला कैक पटीने फायदा होईल.

१) सिग्नेचर कॅम्पेन – या संकेतस्थळावर अनेक कंपन्या त्यांची जाहिरात करण्यासाठी पैसे देतात, माझ्या सिग्नेचर मध्ये दिसत असलेल्या जाहिरातीसाठी सदर कंपनी मला दररोज ६ लाख सातोशी देते. तुमचे ह्या संकेतस्थळावरील अकाउंट किती जुने आहे आणी तुम्ही किती पोस्ट करता ह्यावर ही रक्कम ठरते.



 


२)  वस्तू किंवा सेवा – तुम्ही तुमच्या वस्तू किंवा सेवा देऊन त्याचा मोबदला म्हणून बीटकॉईन स्वीकारू शकता. यामध्ये डोमेन नाव, फेसबुकवर जाहिरात अशा वेगवेगळ्या गोष्टी देता येतात.


३) बीटकॉईन ट्रेडिंग – भारतात नोटाबंदीमुळे बीटकॉईन लोकप्रिय होत आहे आणी दिवसेंदिवस ही लोकप्रियता वाढत जाणार आहे त्यामुळे बीटकॉईन ट्रेडिंग हा अजून एक पर्याय आहे. localbitcoins.com सारख्या संकेतस्थळावर तुम्ही कमी दरात बीटकॉईन विकत घेऊन त्याच संकेतस्थळावर जास्त दरात विकू शकता ज्यामध्ये एका ट्रेड मध्ये तुमच्या गुंतवणुकीवर १% ते २०% पर्यंत उत्पन्न मिळवू शकता.


उदाहणार्थ : अनेकांना त्यांचे बीटकॉईन विकून पेटीम मध्ये पैसे हवे असतात तर अनेकांना त्यांचे पेटीएम मधील पैसे देऊन बीटकॉईन हवे असतात. तुम्ही योग्य किंमत देऊन मध्यस्त म्हणून काम केलेत तर तुमचा बराच फायदा होऊ शकतो.


बीटकॉईन मिळवण्याचे असे अजून शेकडो पर्याय आहेत त्यामुळे कोणत्याही पर्यायाचा अवलंब करताना त्याचा नीट अभ्यास करा. उत्पन्न मिळवा पण ज्ञान देखील मिळवत रहा.


काही वर्षांपूर्वी जेव्हा बीटकॉईनची किंमत काहीच नव्हती तेव्हा एका व्यक्तीने  पिझ्झा १०,००० बीटकॉईन देऊन विकत घेतला, त्यांनी जर ते बीटकॉईन नुसते ठेवले असते  तरी त्याची आजची किंमत ६६ करोड रुपये असती. त्यामुळे आज त्या पिझ्झाप्रमाणे इतर लहान मोठ्या कारणांसाठी, भविष्यातले लाखो रुपये वाया घालवू नका.


येणाऱ्या काळात हे तंत्रज्ञान जगावर राज्य करणार आहे आणी ज्याचे याबद्दल ज्ञान अधिक त्याला मोठी मागणी असणार आहे. ८ वर्षात बीटकॉईन ची किंमत ० रुपयापासून ६० हजारांवर पोहोचली, कदाचित पुढच्या ८ वर्षात ती दीड लाखावर पोहोचेल त्यामुळे बचतीची सुद्धा सवय ठेवा.



Which one should I apply for ad campaign?
Is this available for every blog forum or only this forum?
Please tell me more options for earning Bitcoins.